90 तलवारी पेट्रोलींगदरम्यान हस्तगत

धुळे : धुळे जिल्ह्यातील सोनगीर पोलिसांना पेट्रोलिंग दरम्यान तब्बल 90 तलवारींचा साठा आढळून आल्याने खळबळ माजली आहे. याप्रकरणी 90 धारदार तलवारींसह चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत 7 लाख 13 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या धाडसी कारवाईमुळे संभाव्य अनर्थ टळला असल्याचे म्हटले जात आहे.

पेट्रोलिंग दरम्यान सोनगीर पोलीसांना शिरपूर येथून धुळे शहराच्या दिशेने येणारी स्कॉर्पीओ पोलिसांना संशयास्पद वाटली. या वाहनाच्या चालकाला थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्याने अजून जोरात वाहन नेले. त्यामुळे पोलिसांचा या वाहनावरील संशय गडद झाला. वाहनाचा सिने स्टाईल पाठलाग केल्यानंतर ते पोलिसंच्या हाती आले. वाहनातील चौघांसह वाहनाच्या आतील सामानाची झडती घेतली असता धक्कादायक माहिती पुढे आली. त्या वाहनात तब्बल नव्वद धारदार तलवारी आढळून आल्या. चौघांना तलवारींसह ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here