आक्षेपार्ह चित्रफीत प्रकरणी किर्तनकार महिलेचा अटकपुर्व मंजुर

On: April 28, 2022 10:59 AM

वैजापूर : आक्षेपार्ह चित्रफीत समाज माध्यमांमधे प्रसारीत करणा-या किर्तनकार महिलेचा अटकपुर्व जामीन अर्ज वैजापूरचे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने मंजुर केला आहे. जिल्हा व सत्र न्या. एम. मोहियोद्दीन एम.ए यांच्या न्यायालयासमक्ष  याप्रकरणी कामकाज झाले.

प्रत्येक सोमवारी शिल्लेगाव पोलिस स्टेशनला सकाळी 11 ते 1 या कालावधीत सदर किर्तनकार महिलेस हजेरी लावण्याची अट घालण्यात आली आहे. कीर्तनकार बाळकृष्ण मोगल व त्यांची चाळीस वर्षाची सहकारी महिला अशा दोघांविरोधात धार्मिक व सामाजिक भावना दुखावण्यासह आक्षेपार्ह स्थितीतील चित्रफीत ऑनलाइन प्रसारित केल्याचा आरोप आहे. या आरोपाखाली शिल्लेगाव पोलिस स्टेशनला दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुख्य आरोपी बाळकृष्ण मोगल यास 19 एप्रिल रोजी अटक करण्यात आली होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment