शिक्षिकेवर अत्याचाराच्या आरोपाखाली मुख्याधापकाविरुद्ध गुन्हा

खामगाव : ओळखीचा फायदा घेत शिक्षिकेला घरी बोलावून चाकूचा धाक दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली मुख्याध्यापकाविरुद्ध शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीकांत गुलाबराव वानखडे रा.रमाई संकुल समर्थ नगर खामगाव असे बलात्काराचा आरोप असलेल्या संशयीत मुख्याध्यापकाचे नाव आहे.

तक्रारदार सहायक शिक्षिका आणि तिचा पती असे दोघे जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यरत आहेत. सन 2018 – 19 या कालावधीत दोघे पती पत्नी मुख्याध्यापक वानखेडे यांच्या वाहनाने सोबत शाळेत ये जा करत होते. दरम्यान मुख्याध्यापक वानखडे यांनी शिक्षिकेस घरी बोलावून लगट करण्यास सुरुवात केली. चाकूचा धाक दाखवून शरीर संबंध ठेवू दे अन्यथा मारुन टाकीन अशी धमकी देत तिचे आक्षेपार्ह फोटो काढले. ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्या पतीला 26 एप्रिल रोजी मोबाईलवर अश्लिल मेसेज पाठवला. शिक्षिकेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here