लुटमारीच्या तयारीत असलेली टोळी गजाआड

नाशिक : नकली सोनेरी सोने असली असल्याचे भासवून लुटमार करणारी टोळी पुढील नियोजीत दरोडा टाकण्यापुर्वीच नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केली आहे. दरोडा टाकण्याच्या उद्देशाने सापुतारा ते वणी रस्त्यावर काही संशयीत येणार असल्याची माहिती नाशिक ग्रामीण पोलिस अधिक्षक सचिन पाटील यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे त्यांनी पेट्रोलिंग करणा-या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सापळा रचण्याकामी योग्य त्या सुचना दिल्या. या सापळ्यात सात संशयीत दरोडेखोरांना त्यांच्या ताब्यातील वाहनांसह ताब्यात घेण्यात आले.

जयप्रकाश पंढरीनाथ मेहेर, रा. सातपाडी, ता. पालघर, जि. ठाणे हल्ली. सुरगाणा, ता. सुरगाणा, रमेश देवाजी पवार, रा. मोकपाडा, ता. सुरगाणा, वसंत सिताराम पवार, रा. मोकपाडा, ता. सुरगाणा, संपत राजाराम मुढा, रा. अलंगुण, ता. सुरगाणा, लक्ष्मण मधुकर कोल्हे, रा. वडपाडा, ता. सुरगाणा, कमलाकर सुरेश गांगुर्डे, रा. वडपाडा, सुरगाणा, शिवदत्त सोमनाथ विश्वकर्मा, रा. सुरगाणा, ता. सुरगाणा यांना जागीच अटकाव करुन ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकब्जात तले. त्याच्या कब्जातील स्कॉर्पिओ, तवेरा अशी तिन वाहने हस्तगत करण्यात आली. या वाहनांसह सर्वांच्या अंगझडती दरम्यान त्यांच्या कब्जातून तिन डोन्ना कंपनीचे ब्लॅक पेपर स्प्रे, स्कु ड्रायव्हर, लोखंडी टॉमी, नायलॉन दोरीचे बंडल, चिकटपट्टी असे दरोडा टाकण्याचे साहित्य तसेच सोनेरी रंगाची धातुची बिस्किटे व नाणे, रोख 3 लाख 18 हजार 660 रुपये आणि 13 मोबाईल हॅंडसेट असा एकुण 12 लाख 79 हजार 860 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ताब्यातील आरोपी जयप्रकाश मेहेर हा सराईत गुन्हेगार आहे. त्याने त्याच्या साथीदारांसह चार दिवसापुर्वी गुजरात राज्यात दरोडा टाकला आहे. त्या दरोड्यातील रोख रक्कम त्याच्यासोबत होती. त्याच्याजवळ असलेल्या सोनेरी रंगाच्या धातुच्या बिस्किटाबाबत त्याला विचारणा करण्यात आली. याबाबत त्याने पथकाला सांगितले की सदर बिस्किटे व नाणे ही सोन्याची असल्याचे भासवुन वाहनधारकांना अडवून त्यांची लुटमार केली जाते. वणी सापुतारा रोडवर दरोडा टाकण्यासाठी सर्व तयारीनिशी सर्वजण आलेले होते.
ताब्यातील सर्वांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध वणी पोलिस स्टेशनला दरोडा तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पोलीस स्टेशनचे पोलिस अधिकारी व अंमलदार करत आहेत. नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्यासह सपोनि मयुर भामरे, वणी पो.स्टे. चे सपोनि स्वप्निल राजपुत, पोउनि उदे, तसेच स्थागुशाचे सपोउनि नाना शिरोळे, पोहवा दिपक आहिरे, प्रविण सानप, किशोर खराटे, नवनाथ सानप, पोकॉ गिरीष बागुल आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here