पाकिस्तानी न्यूज चॅनल “डॉन” वर भारताचा झेंडा

On: August 3, 2020 10:25 AM

इस्लामाबाद : डॉन या पाकिस्तानी न्यूज चॅनल वर एकाएकी भारताचा झेंडा फडकल्याची घटना उघड झाल्याने पाकिस्तानात खळबळ माजली आहे. पाकिस्तानमधील लोकप्रिय नुज चॅनल “डॉन” वर रविवारी दुपारी तिरंगा फडकल्याचे दिसून आले. यावेळी भारताला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या बाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे वृत्त आहे. भारताचा झेंडा फडकल्यानंतर या न्युज चॅनलची सिस्टम हॅक झाल्याचे सांगण्यात येत आहे.

पाकिस्तानच्या डॉन या न्यूज चॅनलचे काम हे नियमीतपणे सुरु असतांना रविवारी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास अचानक भारताचा झेंडा चॅनलवर फडकल्याचे दृश्य सर्वांना दिसले. या व्हिडीओसोबतच स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा असा संदेश देखील आला. हा व्हिडीओ आणि फोटो हे समाज माध्यमांवर प्रसारित होत आहे.

या न्यूज चॅनलची सिस्टम हॅक करण्यात आल्याचे वृत्त आहे. या घटनेमागे काही हॅकर्स असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याप्रकरणी तपास सुरु असल्याचे “डॉन” ने म्हटले आहे. हा प्रकार नेमका कसा झाला याचा तपास सुरु असल्याचे समजते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment