मंत्री गडाखांच्या पीए वरील जीवघेणा हल्ला—– स.पो.नि. बागुलांनी गाठला कंट्रोलचा पल्ला

नगर : स.पो.नि. सचिन बागुल यांची सोनई पोलिस स्टेशनमधून तातडीने नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात मंत्री शंकरराव गडाख यांचे पीए राहुल राजळे यांच्यावरील प्राणघातक हल्ला या बदलीमागचे कारण म्हटले जात आहे. स.पो.नि. सचिन बागुल यापुर्वी जळगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनला कार्यरत होते. नेवासे पोलिस स्टेशनचे स.पो.नि. माणिक चौधरी यांच्याकडे सोनई पोलिस स्टेशनचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.

गेल्या महिन्यात मंत्री शंकरराव गडाख यांच्या स्विय सहायकांवर झालेल्या गोळीबारात गावठी कट्ट्याचा वापर झाला होता. या जीवघेण्या हल्ल्यात स्विय सहायक राहुल राजळे गंभीर जखमी झाले होते. या घटनेप्रकरणी तीन ते चार आरोपी अटक करण्यात आले होते. या घटनेनंतर स.पो.नि. बागुल यांच्या बदलीच्या चर्चेला वेग आला होता. नगर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी बागुल यांची नियंत्रण कक्षात बदली केली आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here