शिवसेनेचा मनसेला इशारा…तर आता आमच्या स्टाईलने चोप देऊ

शिवसेनेचा मनसेला इशारा...तर आता आमच्या स्टाईलने चोप देऊ

मुंबई : मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना दोन वर्षासाठी तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आहे. अविनाश जाधव यांच्या अटकेनंतर न्यायालयाने त्यांना ३ ऑगस्टपर्यत पोलीस  कोठडी सुनावली आहे. या अटकेमागे शिवसेनेचे नेते व ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप मनसेकडून केला जात आहे. मनसेच्या या आरोपानंतर शिवसेनेकडून देखील प्रति उत्तर देण्यात आले आहे.

शिवसेनेचे ठाण्याचे नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य महेश गायकवाड यांनी फेसबुकवर एक  व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी मनसेला इशारा दिला आहे. पालकमंत्र्याच्या विरोधात टीका केली तर शिवसेना स्टाईलने चोप देवू असे महेश गायकवाड यांनी म्हटले आहे. या काळात कोरोना संकट असल्यामुळे शिवसैनिक संयमी भुमीका ठेवून आहेत. टीका केल्यास शिवसेना स्टाईलने उत्तर देण्याचा इशारा महेश गायकवाड यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here