धुळे एसीबीच्या तावडीत ग्रामविकास अधिकारी

जळगाव : पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून गटार व ढापे पुर्ण केल्याबद्दल सब कॉंन्ट्रॅक्टरला त्याच्या बिलाची रक्कम अदा करण्याच्या बदल्यात अकरा हजार रुपयांची लाच स्विकारतांना ग्राम विकास अधिकारी एसीबी धुळे पथकाच्या तावडीत सापडला आहे. भगवान पांडुरंग यहीदे ,ग्रामविकास अधिकारी, वर्ग- 3 ग्रामपंचायत वर्डी, ता चोपडा जि. जळगाव (रा. प्लॉट न 65 बोरोले नगर 2 चोपडा जि. जळगाव) असे लाचखोराचे नाव आहे.

सुरुवातीला 12 हजार 500 रुपयांची मागणी केल्यानंतर तडजोडीअंती अकरा हजार रुपये देण्या घेण्याचे ठरले होते. धुळे एसीबीचे पोलिस उप अधिक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण तसेच राजन कदम, शरद काटके, संतोष पावरा, सुधीर मोरे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here