तिस-या मजल्यावरुन फेकल्याने तरुणाचा मृत्यु – दोघे ताब्यात

जळगाव – जळगाव शहरातील गोलाणी मार्केट येथील एका घटनेत दोघा तरुणांनी त्यांच्या एका मित्राला तीस-या मजल्यावरुन फेकून दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. मार्केट मधील सिसीटिव्ही फुटेजचा या तपासकामात मोठा उपयोग झाला आहे.

मुकेश रमेश राजपूत याच्या मृत्यू प्रकरणी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली होती. तपासाअंती अमर शांताराम बारोट उर्फ लखन रा. कासमवाडी, रचना कॉलोनी जळगांव व पराग रविन्द्र आरखे उर्फ बबलु, रा. न्यु सम्राट कॉलनी, पंचमुखी हनुमान मंदीराच्या मागे जळगांव अशा दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून अजून एकाला ताब्यात घेतले जाणार आहे.

पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांच्यासह सपोनी संदीप परदेशी, पोहेकॉ भास्कर ठाकरे, विजय आंनदा निकुंभ, पोकॉ रतन गीते आदींनी घटनास्थळी भेट देत परिसराची आणि सीसीटिव्ही फुटेजची बारकाईने पाहणी केली.संजय बडगुजर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जळगाव शहर पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि संदीप परदेशी करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here