दारुचे व्यसन सुटत नसल्यामुळे ट्रकचालकाची आत्महत्या

बीड : दारुचे व्यसन सुटत नसल्यामुळे गळफास घेत व्हिडीओ  कॉल करुन आपली जीवनयात्रा संपवली आहे. या घटनेप्रकरणी नेकनूर पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद घेण्यात आली आहे.

लक्ष्मण रामचंद्र महागडे (बार्शी जि. सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. मयत लक्ष्मण महागडे हा ट्रक चालक बार्शी येथून जालन्याकडे भरलेला ट्रक घेऊन जात होता. शुक्रवारी मांजरसुंब्याजवळ एका धाब्यावर मुक्काम केल्यानंतर त्यांनी परिजनांना  व्हिडिओ कॉल करुन आत्महत्या करत असल्याचा व्हिडीओ कॉल केला. आपले दारुचे व्यसन सुटत नसल्याचे म्हणत एका झाडाला गळफास घेत महागडे यांनी आपले जीवन संपवले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here