आदित्य ठाकरेंचा कारमधील तो फोटो चर्चेत

On: August 3, 2020 6:55 PM

मुंबई : महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा कारमधील एक फोटो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला असून त्या फोटोबाबत चर्चा सुरु झाली आहे. आदित्य ठाकरे कारमधे एका तरुणीसोबत बसल्याचा तो फोटो आहे. काही जणांच्या मते त्यांच्या सोबत फोटोतील ती तरुणी रिया चक्रवर्ती असल्याचे म्हटले जात आहे. ती तरुणी रिया चक्रवर्ती नसून अभिनेत्री दिशा पटानी असल्याचे देखील म्हटले जात आहे.

व्हायरल झालेला हा फोटो काही वर्षापुर्वी काढण्यात आला होता. आदित्य आणि दिशा हे दोघे मुंबईतील एका रेस्टॉरंट मधे जेवण करण्यास सोबत गेले होते. त्यावेळी काढलेला हा फोटो आता  व्हायरल करण्यामागचे कारण काय?  असा देखील एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. सध्या रिया चक्रवर्ती व सुशांतसिंग राजपूत यांचा विषय चर्चेत आहे.  सुशांतच्या कथित आत्महत्येसाठी त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती जबाबदार असल्याचे आरोप केले जात आहे. सुशांतचे चाहते या घटनेबाबत सीबीआय चौकशीची मागणी करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment