तुळजापूर मंदीरात अधिकृत आणि अनधिकृत पुजा-यांवर कारवाई

तुळजापूर : तुळजापूर मंदीरातील पुजा-यांवर कारवाईच्या घटना वेळोवेळी समोर येत आहेत. अशा घटनांमुळे तुळजापूर मंदीरातील गैरव्यवहार देखील समोर येत असतात. अशाच एका नव्याने उघड झालेल्या घटनेत एका अधिकृत आणि एका अनधिकृत पुजा-यावर सहा महिन्यासाठी मंदीर बंदची कारवाई करण्यात आली आहे. अलोक काकासाहेब शिंदे असे अधिकृत आणि अतुल अंगद सलगर असे अनधिकृत पुजा-याचे नाव आहे.

सुरक्षा रक्षकांशी हुज्जत घालत तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्यात प्रवेश केला म्हणून अलोक शिंदे याच्यावर तर गाभाऱ्यात पूजा केली म्हणून अतुल सलगर या अनधिकृत पुजा-यावर देऊळ कवायत कलम 24 व 25 नुसार मंदिर संस्थानला असलेल्या अधिकारानुसार सहा महिने मंदिर बंदची कारवाई करण्यात आली आहे. या पुजा-यांना बारा महिने मंदिर बंद का करण्यात येऊ नये अशी नोटीस देखील बजावण्यात आली आहे. 20 मे रोजी घडलेल्या या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेज नुसार सदर कारवाई करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here