मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचे कथित आत्महत्या प्रकरण सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आले आहे. आता या प्रकरणी राजकारणाने शिरकाव केल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रातील सत्ताधारी शिवसेना व विरोधी पक्ष भाजपा हे आमने सामने आल्याचे चित्र दिसत आहे.
राज्याचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सुशांत सिंह राजपूतच्या कथित आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांवर टीकाटिपण्णी केली होती. आता या टीकेला शिवसेनेच्या बाजूने प्रत्युत्तर दिले जात आहे.
सुशांत सिंह राजपूत याच्या कथित आत्महत्येचा तपास बघता निर्दोष आणि स्वाभिमानी नागरिकांसाठी मुंबईत राहणे सुरक्षित नसल्याची टीका अमृता फडणवीस यांनी केली होती. त्या टिकेला शिवसेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
या टीकेला प्रत्युत्तर देतांना सरदेसाई यांनी ट्विटमधे म्हटले आहे की मॅडम, तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय मुंबई पोलिसांचे संरक्षण घेत असून त्यांच्यावरच असले आरोप करता? मुंबई पोलिसांवर विश्वास नसेल तर घेतलेले सरंक्षण सोडून द्या. याच मुंबई पोलिसांच्या उमंग कार्यक्रमात आपण गायन केले. असा सवाल वरुण सरदेसाई यांनी ट्विटच्या माध्यमातून अमृता फडणविस यांना विचारण्यात आला आहे.