रात्रगस्ती दरम्यान मोटारसायकल चोरास अटक

जळगाव : जिल्हापेठ पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाच्या हाती रात्रगस्तीदरम्यान मोटार सायकल चोरटा लागला असून त्याला अटक करण्यात आली आहे. ज्ञानेश्वर खुशाल पाटील रा. हिंगोणा ता. धरणगाव जिल्हा जळगाव असे अटकेतील मोटार सायकल चोरट्याचे नाव आहे. जिल्हापेठ पोलिस स्टेशनला दाखल गु.र.न. 348/2022 भा.द.वि. 379 चा गुन्हा त्याच्याकडून उघडकीस आला आहे.

रात्री रात्रगस्तीवर असलेले पोना जुबेर तडवी व पोकाँ अमित मराठे असे दोघे रात्रगस्तीवर असतांना त्यांना एक संशयीत मोटार सायकलस्वार आढळून आला. त्याची सखोल चौकशी केली असता त्याने आपला मोटार सायकल चोरीचा गुन्हा कबुल केला. त्याला अटक करण्यात आली असून या गुन्ह्याचा पुढील तपास पो.नि. अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक संतोष सोनवणे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here