महिलांना छळणा-या तरुणाची गळा आवळून हत्या

मालेगाव : नातेवाईक महिलांना हेतुपुरस्सर वाईट हेतू मनात बाळगून त्रास देणा-या तरुणाचा दोघांनी दोरीने गळा आवळून खून केल्याचे उघड झाले आहे. अमोल धोंडीराम व्हडगर (25) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. गोविंद वाळूबा केसकर व सोनू ऊर्फ चैतन्य साहेबराव केसकर (दोघे रा. नांदूर) यांना संशयीत आरोपीच्या रुपात पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दोघांनी पुरावा नष्ट करण्यासाठी मयत तरुणाचे हातपाय दोरीने बांधून त्याला नाग्यासाक्या धरणात फेकून दिल्याचे सांगितले जात आहे.

सोमवारी सकाळी धरण परिसरात मृतदेह आढळून आल्यानंतर काही तासातच पोलिसांनी या गुन्ह्याचा उलगडा करत दोघांना अटक केली आहे. महिलांवर बळजबरी करत असल्याच्या रागातून हा हत्येचा प्रकार घडला असल्याचे तपासात पुढे आले आहे. मयताला याप्रकरणी नातेवाईकांनी वेळोवेळी समजावले होते. घटनेच्या रात्री एका लग्न समारंभात मयत आणि दोघा संशयीत आरोपींचा सहभाग होता. त्या माहितीच्या आधारे पोलिसंचा तपास पुढे सरकला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here