सर्वोच्च न्यायालयाचे न्या. एल. नागेश्वर राव यांच्या यांच्या अध्यक्षतेखाली तिन सदस्यांच्या खंडपीठाने वेश्या व्यवसायाबाबत आज एक महत्वपुर्ण निर्णय दिला आहे. वयाची अठरा वर्ष पुर्ण केलेली व्यक्ती आपल्या मर्जीने सेक्स वर्करचे काम करत असल्यास तो गुन्हा मानला जाणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
सेक्स वर्कर हा एक पेशा आहे. एखादी प्रौढ व्यक्ती आपल्या मर्जीने सेक्स वर्करचे काम करत असल्यास त्या व्यक्तीविरुद्ध कारवाई करण्याचा अधिकार पोलिसांना नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. अशा व्यक्तीला अटक करुन पोलिसांनी त्रास देवू नये असे देखील न्यायालयाने पोलिसांना उद्देशून नमुद केले आहे. अनुच्छेद 21 नुसार सर्वांना सन्मानपुर्वक जीवन जगण्याचा मुलभूत अधिकार आहे. सेक्स वर्क बेकायदा नसले तरी वेश्यालय/कुंटणखाना चालवणे मात्र बेकायदा असल्याचे म्हटले आहे. या शिफारशीवर सुनावणीसाठी न्यायालयाने 27 जुलै ही पुढील तारीख निश्चीत केली असून या तारखेला केंद्र सरकारने उत्तर द्यायचे आहे.