आर्णी न्यायालयात दोघा वकिलांमधे हाणामारी


यवतमाळ : दिग्रस येथील दोघा वकिलांंमधे जोरदार हाणामारी झाल्याने दोघेही जखमी झाले आहेत. अ‍ॅड. दुर्गादास राठोड व अ‍ॅड. राहुल ढोरे असे दोघा वकिलांची नावे आहेत. दोघांमधील जुन्या वादाचे रुपांतर हाणामारीत झाल्याची घटना उघडकीस आली आहे. न्यायालयातील बार रुममधे झालेल्या हाणामारीत काठी आणि ब्लेड कटरचा वापर झाला. त्यात दोघे वकील जखमी झाले.

अ‍ॅड. दुर्गादास राठोड यांच्या चारचाकीच्या काचा देखील या घटनेत फोडल्याचे आढळून आले. दोघा जखमी वकिलांवर स्थानिक ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय उपचार करण्यात आले. पुढील उपचारार्थ त्यांना यवतमाळ येथे हलवण्यात आले. याप्रकरणी अ‍ॅड. राहुल ढोरे यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here