मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना छातीत त्रास होत असल्यामुळे परेल येथील के.ई.एम. रुग्णालयाच्या अती दक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. रक्तदाब वाढल्यामुळे त्यांची स्ट्रेस थिलीयम हार्ट टेस्ट केली जाणार असल्याचे वैद्यकीय सुत्रांकडून सांगण्यात आले आहे.
माजी मंत्री अनिल देशमुख सध्या सीबीआय कोठडीत असून त्यांच्यावर 100 कोटी वसुलीचा आरोप आहे. रा.कॉ. पक्षातील जेष्ठ नेते असलेल्या अनिल देशमुखांनी जवळपास पावणे दोन वर्ष महाविकास आघाडी सरकारमधील गृहमंत्रीपद सांभाळले. मात्र 100 कोटीच्या खंडणी प्रकरणी झालेल्या आरोपांमुळे त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.