कंटेनरला लागलेल्या आगीत 27 फ्रिज जळून खाक

जळगाव : पुणे येथून फ्रिज भरुन आलेल्या कंटेनरला लागलेल्या आगीत 64 नव्या को-या फ्रिजपैकी 27 फ्रिज जळून खाक झाले आहेत. जळगाव शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील हॉटेल द्वारकानजीक मालधक्का येथे सदर घटना सायंकाळी पाच वाजता घडली. सदर आग विझवण्याकामी दोन बंब लागले.

या कंटेनरमधील फ्रिज रेल्वेने कोलकाता येथे जाणार होते. एस.के. ट्रान्स लाईनचे सुपरवायझर निलेश महाजन यांनी दिलेल्या माहितीवरुन मनपा अग्निशमन विभागाचे अधिकारी शशीकांत बारी यांच्या पथकातील कर्मचारी वाहन चालक देविदास सुरवाडे, रोहिदास चौधरी, परमेश्वर कोळी, भगवान पाटील, नितीन बारी, वसंत कोळी, वाहन चालक प्रदीप धनगर, जगदीश साळुंखे आणि होमगार्ड कर्मचारी अनिल पाटील आदींनी या आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र यातील 27 फ्रिज जळून खाक झाले आहेत. 37 फ्रिज मात्र वाचवण्यात अग्निशमन विभागाला यश आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here