मित्राच्या भांडणात मध्यस्थी करणाऱ्याची नाशिकला हत्या

नाशिक : मित्राच्या भांडणात मध्यस्थी करणा-या तरुणाला दुस-या गटातील तिघा तरुणांनी चाकूने भोसकून जखमी केले. उपचारादरम्यान सागर रावसर या जखमी तरुणाचे रविवारी निधन झाले. मुंबई नाका परिसरातील शिवाजीवाडी परिसरात घडलेल्या या घटनेप्रकरणी प्रकाश रावसर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुंबई नाका पोलिस स्टेशनला तिघांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित भारत भोये, गणेश भोये, गौतम भोये या तिघा संशयीत तरुणांना अटक करण्यात आली आहे.

संकेत कोरडे या तरुणाचा मयत सागर रावसर हा बालपणीचा मित्र होता. संकेत कोरडे याचे भोये परिवारातील एका मुलीसोबत प्रेमसंबंध सुरु होते. त्यामुळे रागाच्या भरात भोये विरुद्ध कोरडे परिवारातील महिला व पुरुषांमधे वाद सुरु होता. यावेळी सागरने त्याचा बालपणीचा मित्र संकेत यास पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला. सागरच्या या सल्ल्याचा भोये परिवारातील तिघा तरुणांना राग आला. या रागाच्या भरात तिघांनी सागरला चाकूने भोसकून जखमी केले. त्यात तो उपचारादरम्यान मरण पावला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here