अकरा वर्ष मुलीवर अत्याचार करणा-या बापास अटक

औरंगाबाद : औरंगाबाद नजीक गारखेडा येथील एका मनोविकृत पित्याने आपल्याच मुलीवर तब्बल अकरा वर्ष अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. मुलीच्या अजान वयात बापाने सुरु केलेला हा प्रकार ती सज्ञान झाल्यानंतर देखील त्याने सुरुच ठेवला. अखेर पिडीत मुलीने ती रहात असलेले बापाचे घर सोडले. बापाच्या दुष्कृत्याला वैतागून मुलगी घर सोडून गेल्यावर मुकुंदवाडी पोलिस स्टेशनला तिच्या आईने अपहरणाचा गुन्हा नोंद केला. तिचा शोध लागल्यानंतर मात्र खरा प्रकार उघडकीस आला.  

या नराधम पित्यावर सन 2013 मधे एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याच्या तपासाअंती त्याने जेलवारी देखील केली आहे. जामीनावर बाहेर आल्यानंतर त्याने सदर अत्याचाराचा प्रकार सुरुच ठेवला. पोलिस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांनी नराधम बापाविरुद्ध बलात्कारासह बाल लैंगिक अत्याचाराच्या कलमाखाली वेगळा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here