जळगाव शहरात कंजरवाड्यातील ट्रान्सफॉर्मरला आग

jain-advt

जळगाव : जळगाव शहरातील कंजरवाडा परिसरातील ट्रान्सफॉर्मरला आज सायंकाळी आग लागल्याची घटना घडली. या आगीमुळे परिसरात भितीचे वातवरण निर्माण झाले होते. मात्र परिसरातील रहिवासी शिवसेनेचे कार्यकर्ते राहुल नेतलेकर यांनी परिसरातील नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन करत परिस्थिती योग्य रितीने हाताळली.

राहुल नेतलेकर यांनी उप महापौर कुलभुषण पाटील यांना तातडीने या घटनेची माहिती देत अग्निशमन विभागाचे बंब पाठवण्याची विनंती केली. आगीच्या ज्वाळांनी रौद्ररुप दरम्यानच्या काळात धारण केले होते. महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे बारी, कर्मचारी वाहन चालक निवांत इंगळे, युसुफ पटेल, संतोष पाटील, मोहन भाकरे आदींनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. जिल्हापेठ पॉवर हाउस कक्षाचे अभियंता जयेश तिवारी, कर्मचारी महेश कळसकर, लोंढे, नमो आदींनी देखील तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थीतीवर नियंत्रण मिळवले. कंजरभाट समाजाचे नितीन तमायचे, योगेश बागडे, विजय बागडे, शशिकांत बागडे, विवेक नेतलेकर, निखिल गारुगे, कपिल बागडे, राहुल तमायचे आदींची देखील यावेळी मदत झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here