बेपत्ता विवाहितेचा आढळला जळालेला मृतदेह

शिरपूर :  शिरपूर तालुक्यातील नटवाडे येथील अठरा दिवसांपासून बेपत्ता विवाहितेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ माजली आहे. निर्मला सुनिल पावरा असे सदर विवाहीतेचे नाव आहे. सदर विवाहितेस जाळण्यापुर्वी तिचा दगडाने ठेचून खून केल्याचे दिसून आले आहे. अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याचा अंदाज लावला जात आहे.

मयत सुनिता पावरा ही विवाहीता तिच्या पतीसह वीटभट्टीवर रोजंदारीने कामाला जात होती. चुलत दिरासोबत तिचे अनैतिक संबंध असल्याचा संशय पतीसह तिचा सासरच्या मंडळींना होता. त्यातून गेल्या काही दिवसांपासून घरात वाद देखील सुरु होते. 13 मे रोजी ती घरा सोडून निघून गेल्यानंतर तिच्या पतीने ती हरवल्याबाबत शिरपूर पोलिसात तक्रार दिली होती. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here