चुलत सासऱ्यासोबत पलायन करुन राहणा-या पत्नीची हत्या

शिरपूर : काकांसोबत अनैतिक संबंध ठेवत त्यांच्यासोबत पलायन करुन वास्तव्य करणा-या पत्नीची पतीने निर्घृण हत्या केली असून संशयीत आरोपी पतीला शिरपूर पोलिसांनी अटक केली आहे. शिरपूर तालुक्यातील नटवाडे येथील सुनील रुलसिंग पावरा याने 13 मे रोजी त्याची पत्नी निर्मला पावरा बेपत्ता असल्याची तक्रार शिरपूर पोलिस स्टेशनला दिली होती.

त्यानंतर पत्नी आपल्या काकासोबत कन्नड घाटातील एका झोपडीत रहात असल्याचे सुनिल यास समजले. तेथे जावून त्याने तिला प्रेमाने आपल्यासोबत येण्यास राजी केले. ती त्याच्यासोबत मोटार सायकलने शिरपूरला आली. 30 मे रोजी मध्यरात्री कन्नड येथून नटवाडे येथे आलेल्या सुनीलने करवंद ते नटवाडे दरम्यान निर्मलाच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केली. त्यानंतर तिच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तो तेथून घरी निघून आला. 31 मे रोजी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. चौकशी व तपासाअंती हा खून सुनिल यानेच केल्याचे निष्पन्न झाले. त्याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here