मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या कथीत आत्महत्या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचा काहीही संबंध नसल्याचे प्रतिपादन शिवसेना मंत्री अनिल परब यांनी केले आहे. युवा नेत्याची प्रतिमा मलीन करण्याचे षडयंत्र केलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सुशांत सिंग प्रकरणी आदित्य ठाकरेंचा कुठलाही संबंध नसल्याके आपण छातीठोकपणे सांगतो, ज्यांना असे वाटते त्यांनी मिडीयासमोर येवून पुरावे द्यावे असे आवाहन वाटतं शिवसेना मंत्री अनिल परब यांनी केले आहे.
पुढे बोलतांना अनिल परब म्हणाले की, केवळ युवा नेत्याचे नाव खराब करण्याचे हे काम सुरु आहे. नरेंद्र मोदी यांच्यावर ग्रोधा हत्याकांडाचा आरोप आहे. अमित शहांचे सोहराबुद्दीन प्रकरणात नाव घेण्यात आले. न्या. लोया यांच्या मृत्यूप्रकरणी नाव घेण्यात आले.
मुंबई पोलिसांची सुरक्षा घेऊन ते गेली पाच वर्ष फिरत आहेत त्यांना आज त्यांना आज भीती वाटत असेल तर त्यांनी राज्य सोडून जाण्याचा टोला अनिल परब यांनी अमृता फडणवीस यांना लगावला आहे. सुशांत सिंग राजपूत प्रकरणी तपासकाम मुंबई पोलीस सक्षमपणे हाताळत असल्याचे ते म्हणाले. सीबीआयकडे तपास देण्याची मागणी हे एक राजकारण आहे. ही मागणी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. बिहारच्या राजकारणासाठी या प्रकरणी वापर केला जात असल्याचे परब म्हणाले.