खूनाच्या आरोपातील दोघांना पोलिस कोठडी

जळगाव : शहरातील कासमवाडी परिसरात तरुणाच्या हत्येप्रकरणी अटकेतील दोघा संशयीतांना न्यायालयाने 9 जून पर्यंत पोलिस कोठडीत रवानगीचे आदेश दिले आहे. सागर पाटील असे मयताचे तर आरिफ शहा अयुब शहा आणि शेख जुबेर शेख भिका सिकलीगर अशी अटक करण्यात आलेल्या दोघा संशयीतांची नावे आहेत.

दोघा संशयीतांना एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने आज दुपारी चार वाजता न्या. सुवर्णा कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर केले. कथित गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असून हत्यार जप्तीसह इतर महत्वाच्या बाबींचा तपास करण्याकामी पोलिस कोठडी आवश्यक असल्याचे तपास अधिका-यांकडून न्यायालयाला सांगण्यात आले. दोन्ही पक्षाची बाजू समजून घेत न्यायालयाने संशयीतांची 9 जून पर्यंत पोलिस कोठडीत रवानगीचे आदेश दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here