सुशांत प्रकरणी आदित्य ठाकरे यांनी दिली प्रतिक्रिया

On: August 4, 2020 7:45 PM

मुंबई : सुशांतसिंह राजपूत याच्या कथित आत्महत्या प्रकरणी सुरु असलेल्या चर्चेच्या गु-हाळात शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचे नाव पुढे आले आहे. या चर्चेच्या पार्श्वभुमीवर आदित्य ठाकरे यांनी एक ट्विट केले आहे.  त्यात त्यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावत हे गलीच्छ राजकारण असल्याचे म्हटले आहे.  

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर विविध तर्कवितर्कासह राजकारणाचा प्रवेश झाल्याचे दिसून येत आहे. भाजप नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment