पिस्टल विक्रेता पळाला पोलिसाला बुक्का मारुन

जळगाव : तेरेमे दम है तो मेरेको पकडके दिखा असे सांगून पोलिसाच्या छातीत बुक्का मारुन पिस्टल विक्रेता पळून जाण्याची घटना 4 जुन रोजी सायंकाळी पावणे सात वाजेच्या दरम्यान चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीत लासूर ते सत्रासेन दरम्यान घडली. दरोड्याच्या तयारीत असलेल्या व पकडण्यात आलेल्या आरोपींकडून गावठी बनावटीचे तीन पिस्टल, 17 जिवंत काडतुस, एक मोटार सायकल व पाच मोबाईल हॅंडसेट असा एकुण 7 लाख 57 हजार रुपये किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. पोलिस महासंचालकांच्या विशेष पथकाने केलेल्या या कारवाई प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनला गु.र.न. 69/22 भा.द.वि. 399,402, 353,323,506 सह शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पो.हे.कॉ. मनोज दुसाने यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सदर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. रविंद्र वसंत घारगे, जिजाबा मल्हारी फाळके, चांदपाशा अजिज शेख, जयेश लक्ष्मण भुरुक, शिकलकर (पुर्ण नाव माहिती नाही) व पळून गेलेला सतनामसिंग महारसिंग जुनेजा, अशा सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील पळून जाणा-या सतनामसिंग जुनेजा याने चौघांना पिस्टलची विक्री केली. तसेच शिकलकर नामक गुन्हेगार चौघांना दरोड्याकामी मदतीसाठी आलेला होता.

पोलिस महासंचालक पथकातील पो.नि. बापू रोहोम यांच्यासह स.पो.नि. सचिन जाधव, स.फौ. बशिर तडवी, हे.कॉ. रामचंद्र बोरसे, सचिन धारणकर, शकील शेख, पोलिस नाईक मनोज दुसाने, कुणाल मराठे, प्रमोद मंडलीक, सुरेश टोंगारे तसेच चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनचे पो.नि. अवतारसिंग चव्हाण, पोलिस उप निरीक्षक अमरसिंग वसावे, हे.कॉ. राकेश पाटील, प्रमोद पारधी, पोलिस नाईक किरण धनगर, किरण पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here