विवाहितेच्या सिनीयर प्रियकराची ज्युनिअरने केली हत्या 

अमरावती : अमरावती येथील एका विवाहितेचे दोघा तरुणांसोबत प्रेमप्रकरण सुरु होते. नवसारी परिसरातील तरुणाचे त्या विवाहितेसोबत अनेक महिन्यांपासून प्रेमप्रकरण सुरु होते. काही महिन्यांपुर्वी चांदूर बाजार तालुक्यातील सोनोरी या गावातील तरुणाचे देखील त्या विवाहितेसोबत प्रेमप्रकरण जुळून आले. दोघा प्रियकरांमधे सोनोरी गावातील तरुण तिच्यासाठी नवीन होता. दरम्यान रविवारच्या दिवशी ज्युनिअर प्रियकराने तिच्या सिनीयर प्रियकराची चाकूने भोसकून हत्या केली. या घटनेदरम्यान एक युवक जखमी झाला आहे. मारेकरी प्रियकराने त्याच्या वाढदिवशी 5 जून रोजीच हा हत्येचा प्रकार केला.

सचिन विजयराव खरात (31), रा. नवसारी असे मयताचे तर राजेश पंडितराव गणोरकर (33), रा. सोनोरी, चांदूर बाजार असे हल्लेखोर संशयित आरोपीचे नाव आहे. नव्या प्रियकराने फोन करुन देखील तिने उचलला नाही मात्र जुन्याने फोन करताच तिने त्याला प्रतिसाद देत बोलावून घेतले. त्यामुळे संतापाच्या भरात विवाहितेसमोरच राजेशने सचिनवर चाकू हल्ला केला. याप्रकरणी गाडगे नगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here