ठाकरे कुटूंबाच्या बदनामीसाठी पडद्यामागून पटकथा ; खा.संजय राऊत यांचा सुशांतसिंग प्रकरणी आरोप

On: August 5, 2020 6:14 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या कथित आत्महत्येचे प्रकरण विविध अंगांनी राजकीय वळण घेत आहे. दररोज नवनवीन आरोप प्रत्यारोप केले जात आहे. यात काही जणांकडून मंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव गोवण्याचा हेतूपुरस्सर प्रकार करत असल्याचा आरोप खा. संजय राऊत यांनी केला आहे. या मुद्द्यावरुन शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधकांची कानउघाडणी केली आहे. 

खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे की युवा नेते आदित्य ठाकरेंवर आरोप करणारे कोण आहेत, याची आपल्याला माहिती आहे. याबाबत लवकरच स्फोट होणार आहे. सुशांतसिंग राजपूतच्या कथीत आत्महत्येच्या प्रकरणात राजकारण केले जात आहे. याबाबत पडद्यामागून पटकथा लिहिण्याचे काम केले जात आहे. हे दळभ्रदी राजकारण असून ठाकरे घराण्याची प्रतिमा मलीन करण्याचा डाव असल्याचे त्यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment