आजचे राशी भविष्य (1/7/2022)

आजचे राशी भविष्य (1/7/2022)

मेष : काही अनुकूल घटना घडतील व तुमचे मनोबल वाढेल. आज एखाद्या कौटुंबिक सोहळ्यात सहभागी व्हाल.

वृषभ : अथक मेहनतीच्या जोरावर ध्येयाकडे वाटचाल सुरु राहील. महत्त्वाच्या कामासाठी भटकंती होईल.

मिथुन : आधुनिक राहणीमानाची आवड जोपासता येईल. एखाद्या सामाजिक कार्यात पुढाकार घ्याल.

कर्क : आक्रमकतेने घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता आहे. कायद्याचे पालन करणे महत्वाचे ठरेल.

सिंह : आज तुम्हाला काही फसव्या संधी चालून येतील. हातचे सोडून पळत्याच्या मागे धावणे हिताचे नाही.

कन्या : आजचा दिवस उत्तम आहे. अपुरी स्वप्ने साकार होतील.

तूळ : उद्योग-व्यवसायात प्रगतिरथ वेगवान राहील. तुम्ही आत्मविश्वासाने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील.

वृश्चिक : कार्यक्षेत्रात काही अंतर्गत राजकारणाचा सामना करावा लागेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल.

धनू : कुठलीही गोष्ट सहज साध्य नसून अथक परिश्रम गरजेचे आहेत. आज नवीन ओळखीत व्यवहार नकोत.

मकर : एखादा विवाह जुळवण्यासाठी यशस्वी मध्यस्थी कराल. आज वचनपुर्ती कराल.

कुंभ : उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कसरत होईल. मित्रांमध्ये काही वैचारिक मतभेद होऊ शकतात.

मीन : उच्चशिक्षितांच्या अपेक्षा वाढतील. रुग्णांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा दिसून येईल.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here