खा. नवनीत कौर राणा यांना कोरोनाची बाधा, दोन्ही मुलांसह परिवारातील सदस्य बाधित

On: August 6, 2020 7:33 PM
खा. नवनीत कौर राणा

अमरावती : सध्या कोरोनाच्या विळख्यात राजकीय नेते देखील अडकत असल्याचे दिसून येत आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त आहे. आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना तपासणी करुन घ्यावी असे आवाहन खा. नवनीत राणा यांच्या वतीने करण्यत आली आहे. आ. रवी राणा यांचे वडील गंगाधर राणा यांच्या कोरोना टेस्टचा अहवाल 2 ऑगस्ट रोजी पॉझीटीव्ह आला होता. त्यानंतर राणा परिवाराची कोरोना टेस्ट करण्यात आली होती.

राणा परिवारातील 11 सदस्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे सांगण्यात येत आहे. यात खा. नवनीत राणा यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांचा व सासू सासरे यांचा समावेश आहे.

आमदार रवी राणा हे त्यांच्या आई -वडिलांसह नागपूर येथे होते. त्यावेळी खा. नवनीत राणा या आपल्या मुलांची काळजी घेण्यासाठी घरीच थांबून होत्या. त्यावेळी त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांनी तपासणी केली असता अहवाल पॉझिटीव्ह आला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment