चोपडा शहरात भर दुपारी दोन घरफोड्या – 4 लाख 65 हजाराचा ऐवज लंपास

जळगाव : चोपडा शहरातील त्रंबकराव नगर प्लॉट तसेच सहकार कॉलनी अशा दोन ठिकाणी घरफोड्या झाल्या आहेत. दोन्ही ठिकाणी एकुण 4 लाख 65 हजाराचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे. त्यात रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने यांचा समावेश आहे.

त्रंबकराव नगर प्लॉट भागातील संतोष शिवदास सोनवणे यांच्या राहत्या घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी 30 जून रोजी भर दुपारी प्रवेश केला. घराच्या बेडरुम मधील लाकडी कपाटाचे ड्रावर आणि लॉकर तोडून 80 हजार रुपये रोख, दिड लाख रुपये किमतीची 50 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत लंपास केली. चोपडा शहर पोलिस स्टेशनला याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उप निरीक्षक घनशाम तांबे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.

दुस-या घटनेत सहकार कॉलनी भागात राहणारे कैलास रामदास पाटील यांच्या बंद घराचे कुलूप देखील चोरट्यांनी 30 जूनच्या भर दुपारी तोडून प्रवेश मिळवला. या घटनेत 85 हजार रुपये रोख, 50 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत व 1 ग्रॅम वजनाच्या दोन अंगठ्या असा एकुण 2 लाख 35 हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला आहे. स.पो.नि. संतोष चव्हाण या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here