सध्याच्या राजकीय घडामोडी लक्षात घेत रा.कॉ.चे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी समाज माध्यमांवर एक पोस्ट व्हायरल केली आहे. या पोस्टची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
डॉ. अमोल कोल्हे यांनी लिहिलेल्या कवितेत राजकीय भाष्य केले आहे. “खुर्ची तीच पाय तेच, फक्त वरचं बुड बदललं. हुजरे तेच मुजरे तेच, फक्त समोरचं धुड बदललं. फायली त्याच प्रस्ताव तेच, फक्त सहीचं पेन बदललं. बोट तेच शाई तीच, फक्त दाबलेलं बटन बदललं. माणसं तीच, भाषा तीच, फक्त आतलं मन बदललं. आरोप तेच प्रकरणं तीच, फक्त वातावरण बदललं. पराभूतानं मन जिंकलं, विजेत्यानं सत्व गमावलं. मतदारांनी लोकशाहीला अन् लोकशाहीनं न्यायपालिकेला पुसलं, एवढं जे महाभारत घडलं, त्यात नेमकं “कोण” जिंकलं?’ अशा पद्धतीचे वर्णन डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून केले आहे.