धनुष्यबाण हातातून जाण्याची शक्यता – संजय राऊत यांचे ट्विट

On: July 8, 2022 10:53 AM

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राजकीय समीकरणे बदलली आहेत. संपूर्ण शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्हच मुळ शिवसेनेच्या हातातून जाण्याची शक्यता बळावली आहे. वेळ पडल्यास नव्या चिन्हावर लढण्याची तयारी ठेवण्याचे निर्देश उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले आहेत.

जब “खोने”के लिए कुछ भी ना बचा हो तो “पाने” के लिए बहुत कुछ होता हैं! जय महाराष्ट्र! असे संजय राऊत यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे. हे ट्विट म्हणजे एक सुचक विधान म्हटले जात आहे. या ट्विटचा प्रत्येक जण आपापल्या परिने अर्थ आणि तर्कवितर्क लावत आहे. न्यायालयीन लढाईत पराभव झाल्यास आपल्याला ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह सोडण्याची वेळ कदाचीत येवू शकते याची जाणीव उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना झाली असावी.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment