मुंबई : पंतप्रधान मोदी हे कपड्यांसह रुप पालटून फिरण्याचे शौकीन आहेत. फडणवीसही तेच करु लागले. त्यांनी शिंदे यांना भेटायला जाताना नकली दाढी -मिश्या देखील लावल्या असाव्यात. हे सर्व रहस्य त्यांच्या पत्नी सौ. अमृता फडणवीस यांनी फोडले नसते तर या महान कलावंताची महाराष्ट्राला ओळखच झाली नसती, अशी उपरोधिक टीका संजय राऊत यांनी केली आहे.
शिवसेनेची साथ सोडून एकनाथ शिंदे गटासोबत जाऊन भाजपशी हातमिळवणी करणाऱ्या बंडखोर खासदारांवर संजय राऊत यांनी नवा निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. या ट्विटमध्ये एक अस्वल दिसत आहे. या अस्वलासमोर आरसा येताच ते स्वत:लाच पाहून गांगरलेले दिसते. हाच धागा पकडून संजय राऊत यांनी सध्या सुरु असलेल्या राजकीय परिस्थितीच्या अनुषंगाने बंडखोर आमदारांना टोला लगावला आहे. जेव्हा स्वतःला आरशात पाहताना भीती आणि लाज वाटते, अशी खोचक टिप्पणी संजय राऊत यांनी या माध्यमातून केली आहे.








