‘अब सभी को सभी से खतरा हैं!’ – संजय राऊत

On: July 12, 2022 9:39 AM

मुंबई : “अब सभी को सभीसे खतरा है”! असे सुचक ट्विट शिवसेना नेते संजय राऊत यांनी नव्याने केले आहे. या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी बंडखोरांना एक सूचक इशारा दिला आहे. ‘अब नही कोई बात खतरे की,अब सभी को सभी से खतरा हैं..’ अशा अर्थगर्भ ओळी त्यांनी या नव्या ट्विटमध्ये टाकल्या आहेत. या ट्विटमध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि प्रियंका गांधी आदींना टॅग केले आहे. संजय राऊत यांच्या या ट्विटचा अर्थ काय आहे याविषयी विविध तर्कवितर्क लावले जात आहे.

चार दिवसांपुर्वी खा. संजय राऊत यांनी एक ट्विट केले होते. जब “खोने”के लिए कुछ भी ना बचा हो तो “पाने” के लिए बहुत कुछ होता हैं! जय महाराष्ट्र !., असे संजय राऊत यांनी या ट्विटच्या माध्यमातून सुचीत केले होते. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे संपूर्ण पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ हे सेनेचे चिन्ह शिवसेनेच्या हातातून जाण्याची शक्यता निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांचे ट्विट लक्षवेधी ठरले होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment