मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व युवा नेते आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध ट्विटरवर आक्षेपार्ह पोस्ट लिहिणार्या सुनयना होले यांच्या विरुद्ध मुंबई सायबर विभागात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर सुनयना होले या महिलेची अटकेनंतर सुटका झाली होती. या महिलेला जामीन मिळण्यासाठी दिल्ली भाजपाचे प्रवक्ते ताजिंदर पाल बग्गा यांच्या सांगण्यावरून भाजपा युवा मोर्चाचे देवांग दवे यांनी मदत केल्याचे म्हटले जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून ट्विटरवर उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली जात होती. या अकाउंटची पडताळणी सायबर विभागाकडून सुरु आहे. सुनयना होले यांना जामीन मिळण्यामागे भाजपचे कनेक्शन असल्याचे सांगण्यात येत आहे.
तजिंदर पाल बग्गा यांनी ट्विट करुन देवांग दवे यांना सुनयना होले प्रकरणी योग्य ते लक्ष घालण्यास सांगितले होते. देवांग दवे यांनी ट्विट करुन संबंधित अधिकाऱ्यांशी आपले बोलणं झाले असल्याचे म्हटले आहे. सुनयना होले यांना जामीनही मंजूर झाला असल्याचे देखील ट्विट देवांग दवे यांनी केले आहे. भाजपाच्या या दोन नेत्यांच्या ट्विटमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि युवा नेते आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट लिहिण्यामागे भाजपचा हात असल्याचे म्हटले जात आहे.