आज माईक ओढलाय, उद्या पँट ओढतील – विनायक राऊत

On: July 15, 2022 9:48 PM


मुंबई : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माईक आपल्याकडे खेचला. या प्रकारामुळे विरोधी पक्षांमधून टीका होत आहे. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी देखील टीका केली आहे. ‘आज माईक ओढायला सुरुवात केली, उद्या पँट ओढेल’ अशी बोचरी टीका विनायक राऊत यांनी केली आहे. शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात विनायक राऊतांनी फडणवीसांवर टीका केली आहे.

“हे सगळे आमदार पुन्हा एकदा भगव्याचे शिलेदार म्हणून विधानसभेवर पाठवण्याचा निर्धार, या निर्धार मेळाव्यात करुया. तो दिवस दूर नसून हे औट घटकेचं राज्य आहे. सहा महिने चाललं तर नशीब. आज माईक ओढायला सुरुवात केली उद्या पँट ओढेल, नागडं करुन सोडणार” अशी टीका विनायक राऊत यांनी केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment