अल्पवयीन मुलीस गर्भवती करणा-या तरुणास विस वर्षाची शिक्षा

On: July 16, 2022 3:00 PM

जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील डेराबर्डी येथील सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिला गर्भवती करणाऱ्या आरोपीस जिल्हा सत्र न्यायालयाने विस वर्ष सश्रम कारावासासह 30 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. न्या. बी. एस. महाजन यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला आहे. रविंद्र उर्फ रितेश बापू निकुंभ रा. डेराबर्डी तालुका चाळीसगाव असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे

या खटल्यात एकूण बारा साक्षिदारांची तपासणी करण्यात आली. खटला सुरु असतांना पिडीत मुलगी सज्ञान झाली. दरम्यानच्या काळात तिचा विवाह झाला मात्र दिर्घ आजाराने तिचा मृत्यु देखील झाला. त्यामुळे तिची साक्ष नोंदवण्याचे काम राहिले. या खटल्यात पिडीतेचे वडील, वैद्यकीय अधिकारी व इतर साक्षीदारांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्या. सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील ॲड. चारुलता बोरसे यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. केसवॉच म्हणून दिलीप सत्रे यांची मदत झाली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment