अ‍ॅड. प्रविण चव्हाण यांना आ. कदम प्रकरणातून केले बाजूला

On: July 27, 2022 7:01 AM

पुणे : राज्याचे विद्यमान उप मुख्यमंत्री तथा माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आ. गिरीश महाजन यांच्यासह अनेक भाजप नेत्यांना खोट्या प्रकरणात अडकवण्याचा आरोप असलेले अ‍ॅड. प्रविण चव्हाण यांना रा.कॉ. चे माजी आ. रमेश कदम यांच्या विरुद्ध दाखल खटल्यातून हटवण्यात आले आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात राज्य सरकारने विशेष सरकारी वकील अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम यांच्या विरोधातील खटल्याकामी नियुक्ती केली होती. आता त्यांना हटवण्यात आले असून त्यांच्या जागी अ‍ॅड. अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जळगाव येथील फसवणूकीचा एक गुन्हा पुणे येथे वर्ग करुन त्यात आ. गिरीश महाजन यांना मोक्का लावण्याचा कट केल्याचा अ‍ॅड. चव्हाण यांच्यावर आरोप आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment