मंत्रालयात केला धार्मिक विधी – मुख्यमंत्र्यांविरुद्ध गुन्हा

On: July 29, 2022 9:23 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयातील कार्यालयात धार्मिकविधी केल्याप्रकरणी ठाणे न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ठाणे येथील रहिवासी धनाजी सुरोसे सदर तक्रार दाखल केली असून त्याची सुनावणी सोमवारी होणार आहे.

तक्रारदार धनाजी सुरोसे यांच्या तक्रारीनुसार, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा पदभार घेतल्यानंतर 7 जुलै रोजी स्विकारल्यानंतर मंत्रालयातील कार्यालयात सत्यनारायण कथेत सहभाग घेत पूजन केले. हे कृत्य राज्यघटनेच्या विरुद्ध असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या कर्तव्यात शासकीय कार्यालयात धार्मिक पूजा करता येत नाही. शासकीय नियम आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचे या घटनेत उल्लंघन असल्याचे सुरोसे यांनी तक्रारीत म्हटले आहे. ठाणे न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीवर सोमवारी सुनावणी होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment