जुगार खेळणारा तो तरुण मुख्यमंत्र्यांचा पुतण्या नव्हे

मुंबई : मीरा भाईंदरच्या जिसीसी क्लबमध्ये जुगार खेळतांना अटक करण्यात आलेल्या अकरा जणांमधील तो तरुण मुख्यमंत्र्यांचा पुतण्या नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. अटक करण्यात आलेला महेश शिंदे नावाच्या तरुणाने आपण मुख्यमंत्र्यांचा पुतण्या असल्याचे पोलिसांना सांगितले होते.

या प्रकरणी काशिमिरा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या महेश शिंदे याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले फोटो देखील समाज माध्यमात प्रसिद्ध झाले होते. जुगार खेळतांना पकडण्यात आलेल्या सर्वांना जामीनावर मुक्त करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here