तरुणाचा मृतदेह आढळल्याने यावल तालुक्यात खळबळ

जळगाव : आज भल्या पहाटे यावल तालुक्यातील डोंगरकठोरा रस्त्यावर अंदाजे चाळीस वर्ष वयाच्या तरुणाचा मृतदेह आढळून आला. सदर घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ माजली. मनोज संतोष भंगाळे असे मयत तरुणाचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच यावल पोलिस स्टेशनचे पो.नि. राकेश मानगावकर यांनी आपल्या सहका-यांशा घटनास्थळी धाव घेत पुढील तपास व कारवाई सुरु केली.

मयत मनोज भंगाळे हा चितोडा येथील रहिवासी असून त्याचा मृतदेहावर धारदार शस्त्राने वार केल्याचे आढळून आले आहे. प्लॉट खरेदी विक्रीचा व्यवसाय करणा-या मनोज भंगाळे यांची हत्या कुणी व कशासाठी केली हा प्रश्न अद्याप अंनुत्तरीत असुन पोलिस तपासात लवकरच सर्व बाबी उघड होणार असल्याचे जनतेत म्हटले जात आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा मनोज भंगाळे यांचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात रवाना करण्यात आला होता. अधिक तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here