मुंबई : बिहार पोलीस व केंद्राने महाराष्ट्र शासनाविरुद्ध कट केल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत दैनिक सामना या मुखपत्रातून केला आहे. बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे हे बिजेपीचे नेते असल्याचा आरोप खा. संजय राऊत यांनी केला आहे.
सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्येच्या तपासाचा गुंता सुटत नसल्यामुळे यात राजकारणाने शिरकाव केला आहे. सुशांत सिंग राजपूत याच्या कथित आत्महत्या प्रकरणात बिहार सरकारने पडण्याचे काही कारण नव्हते असे खा. संजय राऊत यांनी म्हटले आहे.
सुशांतच्या वडीलांनी दुसरे लग्न केल्यामुळे व ते लग्न सुशांत यास मान्य नसल्यामुळे त्याचे वडीलांसोबत भावनिक नाते संपुष्टात आले होते. त्याच्या वडीलांना पुढे करुन बिहार पोलिसात गुन्हा दाखल करण्यास पुढे करण्यात आल्याचे खा. राऊत म्हणाले. या गुन्हयाचे घटनास्थळ मुंबईत असतांना तपास करण्यासाठी बिहारचे पोलिस मुंबईला येण्याचे समर्थन कसे करता येईल.
मुंबई पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरु असतांना त्यात बिहार पोलिस मुंबईला तपास करण्यासाठी आले. बिहार पोलिस इंटरपोल पोलिस नाहीत. एका राज्याचे पोलिस तपास करत असतांना दुस-या राज्याचे पोलिस संबंध नसतांना समांतर तपासासाठी मुंबईत येणे हा मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर अविश्वास असल्यचे खा. राऊत म्हणाले.
हा तपास मोठ्या प्रमाणात खेचला गेला. हाय प्रोफाईल तपास असल्यामुळे माध्यमांना दिवसाआड माहिती का दिली नाही असा प्रश्न खा. संजय राऊत यांनी विचारत एक प्रकारे मुंबई पोलिसांना देखील दै. सामनाच्या माध्यमातून धारेवर धरले.
सीबीआय म्हणजे केंद्रीय सत्ताधारी मंडळींचे हत्यार असते. ज्यावेळी गोध्रा दंगल झाली होती त्यावेळी मोदी शहांचे असे मत होते. हेच मत सुशांतसिंग राजपूत याच्या कथित आत्महत्येबाबत व्यक्त करण्यात आले तर त्यात चुकीचे काय आहे असा प्रश्न खा. राऊत यांनी केला आहे. सुशांतचा मृत्यू होण्याच्या अगोदर दिनो मोरीया याच्या निवासस्थानी एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
त्या पार्टीचा वापर करुन सस्पेंस तयार करण्यात आले असल्याचे देखील खा. राउत यांचे म्हणणे आहे. त्या पार्टीचा संबंध सुशांतच्या मृत्यूसोबत जोडण्यात आल्याचे खा. राऊत म्हणाले.