बेकायदा पिस्टल बाळगणा-यास एलसीबीने केली अटक

जळगाव : बेकायदा पिस्टल बाळगणा-या रेकॉर्डवरील गुन्हेगारास जळगाव एलसीबी पथकाने अटक केली आहे. पराग राजेंद्र पाटील (21) रा. तेली चौक साई बाबा मंदिराजवळ शनिपेठ जळगाव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या कब्जातून सुमारे तिस हजार रुपये किमतीची पिस्टल हस्तगत करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्या पराग पाटील याच्याविरुद्ध शनीपेठ पोलिस स्टेशनला मारामारीसह चॉपर बाळगण्याचे गुन्हे दाखल आहेत. जुना वचपा काढण्यासह आपल्या जीवाला धोका असल्याची भिती मनात बाळगून तो पिस्टल जवळ ठेवत असल्याचे त्याचे म्हणणे आहे.जळगाव शहराच्या कालिका माता मंदीर परिसरात तो बेकायदा पिस्टलसह वावरत असल्याची माहिती पो.नि. किरणकुमार बकाले यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे पथकाने त्याला ताब्यात घेत अटक केली आहे.

एलसीबी पथकाने त्याला वेळीच अटक केल्याने पुढील अनर्थ टळला असल्याचे म्हटले जात आहे. तिस हजार रुपये किमतीच्या पिस्टलसह त्याला पुढील तपासकामी शनीपेठ पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या पथकातील सहायक फौजदार अशोक महाजन, हे.कॉ. जितेंद्र पाटील, अक्रम शेख, महेश महाजन, पोलिस नाईक नितीन बावीस्कर, प्रितम पाटील, अविनाश देवरे आदींच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.

गेल्या काही महिन्यापासून जळगाव शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. बहुतेक गुन्ह्यात घातक शस्त्रांचा विशेषत: चाकू आणि पिस्टलचा वापर झाल्याचे देखील दिसून आले आहे. वाढत्या गुन्हेगारीवर आणि घातक शस्त्रांवर आळा बसवण्याच्या सुचना पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांना दिल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून सदरच्या कारवाईकडे पाहिले जात आहे. आजकालच्या तरुणांमधे शस्त्र बाळगण्याचा कल मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी शक्य तेवढी कडक कारवाई मोहीम राबवण्याची गरज असल्याचे जनतेत म्हटले जात आहे. जळगाव जिल्ह्याच्या हद्दीवर चोपडा तालुक्याला लागून उमर्टी येथे अवैध आणि कमी किमतीत शस्त मिळत असल्याने गुन्हेगारी फोफावली असल्याचे देखील बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here