24, 26 आणि 31 ऑगस्ट रोजी जळगावला मटण विक्रीस बंदी

जळगाव : जळगाव शहरात 24, 26 आणि 31 ऑग़स्ट या तिन तारखांना मटण मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय महानगर पालिका प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. या तिन तारखांना मटण विक्री बंद राहण्यासाठी योग्य ती उपाययोजना राखण्यासाठी शहरातील सर्व पोलिस स्टेशनला निर्देश देण्यात आले आहेत.

जैन धर्मियांचे श्रावण वैघ 12 पयुर्षण प्रारंभ दिनांक 24 ऑगस्ट बुधवार रोजी आहे. भाद्रपद शुद्ध 4 संवत्सरी 31 ऑगस्ट रोजी आहे. तसेच 26 ऑगस्ट रोजी बैल पोळा आहे. या तिन सणानिमित्त जळगाव शहर हद्दीतील मटन मार्केट, बिफ मार्केट तसेच स्लॉटर हाउस बंद ठेवण्याचा निर्णय महानगर पालीका प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. बाहेरगावाहून मटण अथवा बिफ मांस जळगाव महानगर पालिका हद्दीत येणार नाही याची खबरदारी आणि उपाययोजना करण्याची विनंती महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here