वादग्रस्त पोलिस निरीक्षक देशमुख मुख्यालयात

संगमनेर : अनेकवेळा वादग्रस्त ठरलेले व सध्या संगमनेर शहर पोलिस स्टेशनला कार्यरत असलेले पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.

गेल्या अडीच वर्षाच्या कालावधीत पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख वादात सापडले. हिंदुत्ववादी संघटनांनी त्यांची अन्यत्र बदली होण्यासाठी मागणी केली होती. संगमनेर येथील कत्तलखाना प्रकरणात ते अडचणीत आले होते.

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे समर्थक समजले जाणारे सामाजिक कार्यकर्ते अमोल खताळ यांनी त्यांच्या मालमत्तेच्या चौकशीची मागणी केली होती. तसेच पो.नि. मुकुंद देशमुख यांच्यापासून आपल्या जीवीताला धोका असल्याचे म्हटले होते. संगमनेर येथे अवैध व्यावसायिकांना पाठीशी घालत असल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. तथापी देशमुख यांची बदली होणार असल्याचे म्हटले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here