रा.काँ.मधून बीजेपीत गेलेले आमदार परत येण्यास आतुर

On: August 10, 2020 1:10 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे बारा आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याची अफवा काही जण पसरवत असल्याची चर्चा बिनबुडाची असल्याची माहिती रा.कॉं.चे राष्ट्रीय प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट करतांना दिली आहे.

नवाब मलीक यांनी पुढे म्हटले आहे की उलट निवडणुकीआधी भाजपात गेलेले आमदार राष्ट्रवादीत परतण्यासाठी उत्सुक आहेत. यावर अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. यावर लवकरच निर्णय घेऊन जाहीर केला जाईल, असं नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे. काही आमदार शरद पवारांना, अजित दादांना भेटून परत येण्याची इच्छा व्यक्त करत आहेत.

कोणत्याही अटी-शर्ती नसतील त्यांनाच प्रवेश दिला जाणार असल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे.शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. मात्र सरकारच्या स्थापनेपासून भाजपकडून वारंवार ठाकरे सरकार पाडण्याचे प्रयत्न केले जात आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे 12 आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. राज्यात नोव्हेंबरमध्ये भाजपाचे ‘ऑपरेशन लोटस’ असल्याचे देखील म्हटले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment