यशवंतनगर श्री. गणेश मित्र मंडळाची कार्यकारिणी जाहीर

जळगाव : रामानंदनगर स्टॉपनजीक यशवंतनगरमधील श्री. गणेश मित्र मंडळाची कार्यकारिणी नुकतीच झालेल्या बैठकीत जाहीर करण्यात आली. यात अध्यक्षपदी सागर गलु चौधरी, उपाध्यक्षपदी ऋषिकेश बालकृष्ण पाटील, सचिवपदी पराग रोहिदास राणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

यावेळी श्री. गणेश मित्र मंडळाचे अकरावे वर्ष असून आठ फुट उंच गणरायाची मूर्ति स्थापन केली जाणार आहे. गणेशोत्सवादरम्यान सामाजिक संदेशात्मक सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजनही मंडळातर्फे करण्यात येणार आहे. यामध्ये वृक्षसंवर्धन व बेटी बचाव बेटी पढाओ यावर संदेशात्मक आरस करण्याचा मानस मंडळाच्या कार्यकारिणीत व्यक्त करण्यात आला आहे.

नविन कार्यकारिणीमध्ये सल्लागारपदी मुकेश तुकाराम बोरोले, खजिनदार म्हणून परेश नारखेडे तर सदस्य म्हणून भुषण नेहेते, अंकित चव्हाण, चेतन नारखेडे, निखील चव्हाण, मनिष बोंडे, देवेश अकोलकर, वैभव अकोलकर, योगेश चौधरी, सिद्धेश कासार, पवन पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here